घशामध्ये घास अडकून चिमुकलीचा मृत्यू, विरहाने आई-वडिलांनी गळफास घेऊन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 02:34 PM2022-07-01T14:34:24+5:302022-07-01T14:53:09+5:30

मुलीचा झालेला मृत्यू सहन झाला नाही, यामुळेच आत्महत्या करत असून यास कोणास ही जबाबदार धरू नये

son bereavement ended his life by strangulation of his parents, Incidents in Atpati taluka | घशामध्ये घास अडकून चिमुकलीचा मृत्यू, विरहाने आई-वडिलांनी गळफास घेऊन संपवले जीवन

घशामध्ये घास अडकून चिमुकलीचा मृत्यू, विरहाने आई-वडिलांनी गळफास घेऊन संपवले जीवन

googlenewsNext

आटपाडी : पोटच्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आई-वडिलांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. करन नाना हेगडे (वय २८) व शीतल करन हेगडे (२२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या हेगडे दाम्पत्या जवळ एक चिट्टी आढळून आली. यामध्ये बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. मुलीचा झालेला मृत्यू सहन झाला नाही, यामुळेच आत्महत्या करत असून यास कोणास ही जबाबदार धरू नये असे या चिट्टीत लिहिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, करण व शीतल यांच्या दोन वर्षीय मुलीचा मागील चार-पाच दिवसांपूर्वी जेवण करत असताना घशामध्ये घास अडकून अचानक मृत्यू झाला होता. मुलीचा असा अचानक झालेला मृत्यू व तिची झालेली धडपड यामुळेच मुलीच्या मृत्यू नंतर हेगडे दाम्पत्य नैराश्यामध्ये होते. त्याच्या नात्यातील एका व्यक्तीच्या तक्रारी वरून त्याच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. परस्पर विरोधी तक्रारी मुले हेगडे कुटूंबीय व्यतीत होते.

राजेवाडी येथील काळा मळा परिसरातील कानिफनाथ मंदिरालगत एका झाडाला करण व शीतल यांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत घटनास्थळी आटपाडी पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले.

Web Title: son bereavement ended his life by strangulation of his parents, Incidents in Atpati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.