पत्नी नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून, चौघावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 07:28 PM2023-01-14T19:28:18+5:302023-01-14T19:28:27+5:30

आरोपींनी रागाच्या भरात धारदार कोयत्याने वार केला. डोक्यावर, मानेवर,चेहऱ्यावर,कानावर,हातावर १८ वार करण्यात आले.

son-in-law killed the father-in-law as his wife was not coming home | पत्नी नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून, चौघावर गुन्हा दाखल

पत्नी नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून, चौघावर गुन्हा दाखल

Next

दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथील मुलगी नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. आप्पासाहेब आण्णाप्पा मल्लाड (वय ४६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात जावई सचिन रुद्राप्पा बळोळी (वय ३३), जावयाचा भाऊ मिलन रुद्राप्पा बळोळी (वय ३१ दोघे रा.ऐगळी,ता अथणी) व इतर दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मिलन रुद्राप्पा बळळ्ळी याला अटक केली आहे. 

पूर्व भागातील दरीबडची येथील आप्पासाहेब मल्लाड हे गावापासून एक किलोमीटर अंतरावर मल्लाड वस्तीवर राहतात. शुक्रवारी ऊस पाठवण्याचे काम सुरू होते.गावातून पावणे आठ वाजता ऊस पाठवून मयत आप्पासाहेब मल्लाड शेताकडे निघाले होते. मासाळ वस्तीकडे जाणाऱ्या कुलाळ यांच्या शेतलाजवळ आरोपीने त्याला रस्त्यावर अडवले. दोघांमध्ये मुलीला नांदवायला पाठवण्यावरुन वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारामारीत झाले. यावेळी जावयाने अचानकपणे कोयत्याने हल्ला केला. पहिला वार चुकवून आण्णाप्पा पळाले, पण आरोपी हे चौघेजण असल्याने पळून जाण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

यानंतर आरोपींनी रागाच्या भरात धारदार कोयत्याने वार केला. डोक्यावर मानेवर,चेहऱ्यावर, कानावर,हातावर १८ वार करण्यात आले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी आरोपीची चप्पल, कापड सापडले आहे. धारदार कोयता जप्त केला आहे. आरोपीने चार चाकी गाडीतून आले होते.
 

Web Title: son-in-law killed the father-in-law as his wife was not coming home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.