तो मी नव्हेच... घरात घुसून सशस्त्र धिंगाणा, ‘सदाभाऊं’च्या मुलाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 05:28 AM2021-09-08T05:28:02+5:302021-09-08T05:29:50+5:30

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यास तलवारीने मारण्याचा प्रयत्न

The son of 'Sadabhau' broke into the house and entered the house armed pdc | तो मी नव्हेच... घरात घुसून सशस्त्र धिंगाणा, ‘सदाभाऊं’च्या मुलाचं स्पष्टीकरण

तो मी नव्हेच... घरात घुसून सशस्त्र धिंगाणा, ‘सदाभाऊं’च्या मुलाचं स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यात माने यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर (सांगली) : पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागातून त्यांचा मुलगा सागर याने साथीदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने (३५) यांना घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ केली. हा प्रकार सोमवारी रात्री तांबवे (ता. वाळवा) येथे घडला. कासेगाव पोलिसांनी सागर सदाभाऊ खोत, अभिजित भांबुरे, स्वप्निल सूर्यवंशी आणि सत्यजित कदम या चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यात माने यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती.
माने सोमवारी रात्री कुटुंबासोबत घरी जेवण करत होते. त्यावेळी सागर खोत साथीदारांसह चाकू, गुप्ती, तलवार अशी प्राणघातक हत्यारे घेऊन माने यांच्या घरात घुसला. ‘तू सदाभाऊंवर टीका करतोस का, तुला मस्ती आली आहे का’, असे म्हणत त्याने माने यांच्यावर हल्ला चढवला. कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने या चौघांनी मोटारीतून तेथून पोबारा केला.  

मी घटनास्थळी नव्हतोच - सागर खोत
या घटनेशी आपला काही संबंध नाही. मी घटनास्थळी नव्हतो. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावे. रविकिरण माने हा आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर नेहमी एकेरी भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो. कदाचित त्याचा जाब विचारण्यासाठी आमचे कार्यकर्ते गेले असतील. मात्र तेथेही माने यानेच त्यांच्याशी उद्धट वर्तन केले आहे, असा खुलासा सागर खोत याने केला.

 

Web Title: The son of 'Sadabhau' broke into the house and entered the house armed pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.