‘सोनहिरा’ची ३१७६ रुपये एकरकमी एफआरपी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:24 AM2020-12-08T04:24:07+5:302020-12-08T04:24:07+5:30
यंदाच्या हंगामासाठी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे एफआरपी आणि साखरेला चांगला दर मिळाल्यास अधिक २०० रुपये असा तोडगा निघाला होता. याप्रमाणे ...
यंदाच्या हंगामासाठी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे एफआरपी आणि साखरेला चांगला दर मिळाल्यास अधिक २०० रुपये असा तोडगा निघाला होता. याप्रमाणे सोनहिरा कारखान्याने १ नोव्हेंबरपासून १५ नोव्हेंबर या कालावधित गाळपास आलेल्या उसाची एफआरपी एकरकमी जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. ३ नोव्हेंबरला गळीत हंगाम सुरू झाल्यापासून केवळ महिनाभरातच २ लाख २ हजार ५२० टन गाळप केले व २ लाख ४ हजार ६६० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नोव्हेंबरच्या
पहिल्या आठवड्यात काही मोजक्या कारखान्यांनी हंगाम सुरू केले. त्यामधील सर्वप्रथम सोनहिरा कातखान्याने एकरकमी एफआरपी दिली.
कारखान्याची दैनिक गाळप क्षमता ५ हजार ५०० टन असल्यामुळे हंगाम वेगात सुरू
आहे. ऊस दरात कारखाना अग्रेसर आहे.
चौकट :
कायदा पाळला
एकरकमी एफआरपी द्यावी, यासाठी कारखान्यांना १५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. सोनहिरा कारखान्याने कायदा पाळला आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली आहे. इतर कारखान्यांनीही एकरकमी एफआरपी द्यावी.
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
फोटो : सोनहीरा कारखान्याचा फोटो वापरावा