कोरोना परतू लागताच गाव सोडले, कामासाठी पुन्हा मुंबई गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:49+5:302021-07-19T04:17:49+5:30
संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच चाकरमान्यांना नोकरीवर ...
संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच चाकरमान्यांना नोकरीवर परतण्याचे वेध लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातून बाहेर पडणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाड्या भरभरुन जात आहेत. तर सांगली महापालिका क्षेत्राची रुग्णसंख्याही नियंत्रणात असल्याने परप्रांतीय कामगारांचे आगमनही सुरु झाले आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरताच नोकरदार कामावर परतले होते, पण एप्रिलपासून रुग्ण वाढू लागल्याने परतावे लागले होते. आता त्यांनी पुन्हा मुंबई-पुण्याकडे धाव घ्यायला सुरुवात केली आहे.
बॉक्स
परदेशात किती गेले?
अमेरिका ३५, आफ्रिका २०, दुबई १५०, चीन १०, ऑस्ट्रेलिया २०, ब्रिटन १०
परराज्यात कितीजण गेले?
कर्नाटक १५,०००, गुजरात ३०००, दिल्ली २,५००, पंजाब ३०००, उत्तर प्रदेश १,५००, राजस्थान २०००, केरळ ३०००, मध्य प्रदेश १,२००
सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे
मुंबई - ३०,०००, पुणे १८,००० औरंगाबाद १,५००, सोलापूर १०००, नागपूर १००, नाशिक ६००
कोट
मुले परदेशात, चिंता भारतात
उच्च शिक्षणासाठी मुलाला अमेरिकेत जावे लागले. तेथे लसीकरण चांगले असले तरी कोरोना स्थिती अद्याप गंभीरच असल्याने चिंता वाटते. मुलाने लसींचे दोन्ही डोस घेतल्याने दिलासा वाटतो.
- मैथिली जावडेकर, सांगली.
सुट्टी वाढवून मिळत नसल्याने मुलाला सौदीमध्ये नोकरीवर हजर व्हावे लागले. आम्ही कुटुंबीय दररोज फोनवरुन त्याच्याशी संपर्कात असतो. तेथील परिस्थिती पाहून पत्नी व मुलांना सोबत नेणार आहे.
- रमीझा खतीब, सांगली