कृष्णेचा पूर ओसरताच दोघी भगिनींनी केली आमणापूर-अंकलखोप पुलाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 12:15 PM2020-08-20T12:15:26+5:302020-08-20T12:18:07+5:30
कृष्णेचा पूर ओसरताच अस्वच्छ झालेला आमणापूर ता.पलूस येथील पूलाची कु.नूतन सूर्यवंशी व आरती सूर्यवंशी या दोन भगिनींनी स्वच्छता केली.
भिलवडी :कृष्णेचा पूर ओसरताच अस्वच्छ झालेला आमणापूर ता.पलूस येथील पूलाची कु.नूतन सूर्यवंशी व आरती सूर्यवंशी या दोन भगिनींनी स्वच्छता केली.
आमणापूर-अंकलखोप या दोन गावांना हा पूल जोडतो.
गेली चार दिवस कृष्णेच्या पुराच्या पाण्यात पूल बुडाला होता.गुरुवारी पहाटे पूर ओसरल्याने हा पूल उघडा झाला.
पूलाच्यासंरक्षण पाईप मध्ये पालापाचोळा,लाकडी ओंडके, काठ्या अडकलेल्या असतात.जळणासाठी त्याचा वापर होत असल्याने त्या काढून नेण्यासाठी लोकांचा नेहमीच प्रयत्न असतो.पण आज तिकडे कोणी फिरकलेच नाही.या
पूलाच्या संरक्षण पाईप मध्ये अडकलेल्या चगाळचोथा दोन महाविद्यालयीन तरूणी उस्फुर्तपणे स्वच्छ करताना दिसल्या. अंकलखोप मळीभाग येथील नुतन सुर्यवंशी आणि आरती सुर्यवंशी यांनी सुरू केलेले हे काम पुलावरून येजा करणारांचे लक्ष वेधत होते.
या सेवाभावी वृत्तीच्या सुर्यवंशी भगीणींप्रमाणेच देशातील प्रत्येक तरूण तरूणींनी कडून अशा समाजकार्यात आपला थोडातरी वेळ देत समाजकार्यात खारीचा वाटा उचलण्याची अपेक्षा आहे.
तरूणींच्या या कार्याचे आमणापूर आणि अंकलखोप ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी होताच कृष्णेची पाणीपातळी ओसरत आहे. यामुळे गेले चार दिवस पाण्याखाली असलेला पूल पून्हा सुरू झाला असून पहाटे पासून टू व्हिलर वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. मा
सुरक्षेच्या कारणास्तव चारचाकी गाड्यांना अजूनही पूलावरून वाहतूकीस प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे.
दुपारी आणखी पाणी ओसरल्यानंतरच चारचाकी वाहतूक सुरू होणार आहे.तर पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाच्या संरक्षण पाईप काही ठिकाणी वाकून, सिमेंट पोल पडून नुकसान झाले आहे.