ज्वारीची श्रीमंती वाढली, गव्हापेक्षा जादा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:36+5:302021-07-14T04:30:36+5:30

सांगली : गरिबाघरचे धान्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीला आता श्रीमंती प्राप्त झाली आहे. एकेकाळी श्रीमंतांचे धान्य म्हणून ज्या गव्हाचा ...

Sorghum richness increased, prices higher than wheat | ज्वारीची श्रीमंती वाढली, गव्हापेक्षा जादा भाव

ज्वारीची श्रीमंती वाढली, गव्हापेक्षा जादा भाव

Next

सांगली : गरिबाघरचे धान्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीला आता श्रीमंती प्राप्त झाली आहे. एकेकाळी श्रीमंतांचे धान्य म्हणून ज्या गव्हाचा उल्लेख होत असे, त्या गव्हाला दरात मागे टाकून ज्वारीने भलताच भाव खाल्ला आहे.

देशांतर्गत ज्वारीच्या उत्पादनात गेल्या वीस वर्षांत मोठी घट झाली आहे. यातील महाराष्ट्राचा वाटाही घटत आहे. एकीकडे उत्पादनात घट होत असताना ज्वारीला मागणी वाढत आहे. गव्हाच्या तुलनेत अधिक पोषक असल्याने गेल्या दोन वर्षांत या मागणीत भर पडली आहे. त्यामुळे गव्हापेक्षा ज्वारी अधिक भाव खात आहे. १९९०च्या दशकात गव्हाच्या किमती ज्वारीपेक्षा अधिक होत्या. आता नेमकी परिस्थिती उलटी झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते यापुढेही ज्वारीची दरातील श्रीमंती कायम राहण्याची शक्यता आहे.

चौकट

अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रति किलो)

वर्ष ज्वारी गहू

१९९० ९ १६

२००० १५ २०

२०१० १६ १८

२०१५ १७ १६

२०२० २६ १९

२०२१ ४० ३३

चौकट

आपल्या आरोग्याची श्रीमंतीही ज्वारीतच

पौष्टिक म्हणून ज्वारी परिचित आहेच. त्यात विविध आरोग्यदायी गुणधर्म आहेत. अमेरिकेसारख्या देशातही ज्वारीला महत्त्व आले आहे. ज्वारीपासून रवा, पोहे, शेवया, लाह्या यासारख्या पदार्थांचे महत्त्व बाजारात वाढत आहे.

त्यात प्रथिनांचे प्रमाण १४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवता येते.

गव्हाच्या तुलनेत यात स्निग्ध पदार्थ, पचणारे तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, ऊर्जा आदी घटक अधिक प्रमाणात आहेत.

जिल्ह्यात उत्पादनाचा टक्का घसरला.

संपूर्ण देशात सर्वाधिक ज्वारी उत्पादन करणारे राज्य म्हणून महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. २००५मध्ये राज्याचा एकूण उत्पादनातला वाटा ५१.२५ टक्के होता. तो २०१०मध्ये ३७ टक्के, २०१५मध्ये ३८ टक्के तर सद्यस्थितीत ३६ टक्के इतका झाला आहे. सांगली जिल्ह्यात २०१६मध्ये ६६ हजार २०० टन गहू उत्पादीत झाला होता. आता हे उत्पादन ४० हजार टनाच्या घरात आले आहे.

कोट

ज्वारी ही पचायला चांगली व पौष्टिक असल्याने ती पूर्वीपासून आम्ही खातो. आता ज्वारी महाग झालीय. तरीही आमच्या रोजच्या आहारात ती कायम आहे.

- बाबुराव राघोबा चव्हाण, सांगली

कोट

ज्वारीची भाकरी पूर्वी खूप खायचो. आता चपातीच खाणे भाग पडत आहे. ज्वारी आता परवडणारी नाही. आवडीचा विचार केल्यास आजही आमची भाकरीलाच पसंती आहे.

- राजेंद्र शितोळे, सांगली

कोट

मला भाकरी खायलाच आवडते, पण रक्तातील साखर वाढल्याने आता चपातीच खावी लागते. गव्हाचे दर पूर्वी जास्त होते आता ज्वारी महागली आहे. त्यामुळे अनेकांना ती परवडत नाही.

- सीताराम ढवळे, कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ

कोट

आमच्या लहानपणी आहारात भाकरीशिवाय काही नव्हते. आता नव्या पिढीला चपाती आवडते. सध्या मी एकवेळ भाकरी व एकवेळ चपाती असा आहार घेतोय.

- रंगराव देसाई, लाडेगाव, ता. वाळवा

चौकट

असे घटले ज्वारीचे उत्पादन

२०१६ - ६६२०० टन

२०१७ - ४४,९०० टन

२०१८ - ३४००० टन

२०१९ - ३९३०० टन

२०२० - ४०१०० टन

Web Title: Sorghum richness increased, prices higher than wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.