जतमधील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:03+5:302021-03-27T04:27:03+5:30
फोटो ओळ : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागणांचे निवेदन शिक्षक महासंघ (शि द) गटाने गटशिक्षणाधिकारी आर. डी. शिंदे ...
फोटो ओळ : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागणांचे निवेदन शिक्षक महासंघ (शि द) गटाने गटशिक्षणाधिकारी आर. डी. शिंदे यांना दिले. यावेळी माधवराव पाटील, मुकुंद सूर्यवंशी,भारत क्षीरसागर, गुंडा मुंजे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : प्राथमिक शिक्षकांच्या सेवापुस्तके अद्ययावत करून केंद्रनिहाय कॅम्प घ्यावेत. वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणीचा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणी शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष माधवराव पाटील यांनी केली आहे. याबाबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर. डी. शिंदे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जत तालुका विस्ताराने मोठा असून २९ केंद्रांचा कार्यभार असणाऱ्या तालुक्यात इतर तालुक्यात पर्यवेक्षणीय यंत्रणा कमी आहे, विस्तार अधिकाऱ्याचे पदे रिक्त आहेत, मराठी व कन्नड भाषांचे विस्ताराधिकारी नेमण्यात यावेत, मासिक पगार व प्रलंबित बिले तात्काळ द्यावेत, वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रस्ताव केंद्रनिहाय आढावा घेऊन ३१ मार्चअखेर प्राप्त शिक्षकांचा प्रस्ताव घेऊन निवडश्रेणीसाठी प्रशिक्षणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी, जिल्हास्तरावरून प्राप्त अनुदानानुसार प्राथमिक शिक्षकांची बरेच वर्षे न मिळालेली फरक बिले तात्काळ अदा करण्यात यावीत,
प्राथमिक शाळेतील न्यायालयीन प्रकरणाचा तडा लावण्यासाठी व शाळांवरील अन्याय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळांची बाजू मांडण्यासाठी वकिलाची नेमणूक करण्यात यावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष माधवराव पाटील, मुकुंद सूर्यवंशी, भारत क्षीरसागर, सुनील गुरव, धनराज पाटील, सुरेश पवार, गुंडा मुंजे, अशोक चव्हाण, दत्तात्रय साळे, भालचंद्र गडदे, साखरे मारोती आदींसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.