दक्षिण महाराष्ट्र बनावट नोटांचा केंद्रबिंदू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:00 PM2019-01-20T23:00:49+5:302019-01-20T23:00:53+5:30

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान ...

South Maharashtra is the focal point of counterfeit currency notes! | दक्षिण महाराष्ट्र बनावट नोटांचा केंद्रबिंदू !

दक्षिण महाराष्ट्र बनावट नोटांचा केंद्रबिंदू !

Next

सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देण्याचा उद्योग अजूनही सुरूच आहे. गेल्या पंधरा वर्षांत सांगली, कोल्हापूर व सातारा हे तीन जिल्हे बनावट नोटांच्या छपाईचे केंद्रबिंदूच ठरले आहेत. या नोटांची छपाई व तस्करीची पाळेमुळे परराज्यात पोहोचली आहेत. ‘रॅकेट’ची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी अनेकदा हात घातला. पण तपास अर्धवट राहत असल्यामुळे तस्करांकडून नोटांचा काळाबाजार ‘सुसाट’ सुरू आहे.
कोल्हापुरातील गांधीनगर पोलिसांंना शनिवारी बनावट नोटांचे प्रकरण हाती लागले. त्याचे ‘कनेक्शन’ सांगली निघाले. गांधीनगर पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी येथे छापा टाकला. तत्पूर्वी सहा महिन्यांपूर्वी सांगलीत बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करणाºया चौघांच्या टोळीला शहर पोलिसांनी पकडले. मुंबई, पश्चिम बंगालपर्यंत तपास गेला; पण ‘बडे मोहरे’ हाताला लागलेच नाहीत. तपास अर्ध्यावरच थांबला. कºहाड (जि. सातारा) येथेही दोन महिन्यांपूर्वी बनावट नोटा चलनात आणताना दोघे सापडले. चार दिवसांपूर्वी सांगलीत संजयनगरच्या आठवडा बाजारात दोनशेच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. गेल्या पंधरा वर्षांत सातत्याने सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार सुरूच राहिला आहे. पोलिसांनी कित्येकदा कारवाई केली, तस्कर, एजंटांच्या मुसक्या आवळल्या; पण कायद्यातील पळवाटांचा आधार घेत संशयित सहीसलामत बाहेर सुटले.
बनावट नोटांच्या छपाईसाठी प्रिंटर, स्कॅनर, कागदांची बंडले, संगणक ही सामग्री अवघ्या ५० ते ६० हजारात खरेदी केली जाते. दोनशे, पाचशे व दोन हजाराच्या नोटांची हुबेहूब छपाई केली जाते. या नोटा चलनात आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली जाते. यासाठी त्यांना घसघशीत कमिशन दिले जाते. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी या नोटा खपविण्यात टोळीचा हातखंडा आहे. केंद्र शासनाने दोनशे, पाचशे व दोन हजाराच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. या नोटेचा कागद अत्यंत हलका आहे. बनावट व खरी अशा दोन नोटा जवळ ठेवल्या तर त्या ओळखणे शक्य होत नाही. याचाच फायदा उठवित टोळीने नोटांच्या छपाईचा उद्योग जोमाने सुरू केला आहे. एक टोळी हाताला लागली तरी, दुसºया टोळीकडून नोटांची छपाई सुरूच असते. त्यामुळे बनावट नोटांची छपाई करणाºया टोळ्या आहेत तरी किती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक प्रकरणे उजेडात : एकालाच जन्मठेप
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी कुपवाडमध्ये बनावट नोटांची छपाई करण्यास आलेल्या ओगलेवाडी (ता. कºहाड) येथील बळीराम कांबळे यास पकडले होते. त्याने ओगलेवाडीत नोटांच्या छपाईचा कारखाना असल्याचे सांगितले. तिथे छापा टाकून शंभर, पाचशे व हजाराच्या लाखो रुपयांच्या नोटा जप्त केल्या. हा तपास मुळापर्यंत गेला. बळीराम कांबळे यास जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तत्कालीन अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील भगतसिंग राजपूत यांनी याचे काम पाहिले होते. याचा अपवाद सोडला तर, अन्य कोणत्याही प्रकरणात संशयितांना शिक्षा झालेली नाही.

Web Title: South Maharashtra is the focal point of counterfeit currency notes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.