सांगली जिल्ह्यात तुरळक पाऊस,  वारणा धरणात 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 08:18 PM2021-07-02T20:18:02+5:302021-07-02T20:19:25+5:30

Rain Sangli : सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यात 0.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ​​​​​​​जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

Sparse rainfall in Sangli district | सांगली जिल्ह्यात तुरळक पाऊस,  वारणा धरणात 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली जिल्ह्यात तुरळक पाऊस,  वारणा धरणात 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात तुरळक पाऊस वारणा धरणात 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यात 0.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.0 (233.8), जत 0.0 (170.8), खानापूर-विटा 0.3 (98.7), वाळवा-इस्लामपूर 0.0 (246.6), तासगाव 0.0 (165.6), शिराळा 0.4 (357.9), आटपाडी 0.0 (98.4), कवठेमहांकाळ 0.0 (148.8), पलूस 0.0 (221.1), कडेगाव 0.1 (172.7)

 वारणा धरणात 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा

जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 19.29 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 42.53 (105.25), धोम 6.08 (13.50), कन्हेर 4.39 (10.10), दूधगंगा 9.71 (25.40), राधानगरी 2.36 (8.36), तुळशी 1.74 (3.47), कासारी 1.05 (2.77), पाटगांव 1.75 (3.72), धोम बलकवडी 1.52 (4.08), उरमोडी 6.17 (9.97), तारळी 3.73 (5.85), अलमट्टी 90.33 (123).

विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 24, वारणा 700, दुधगंगा 700, राधानगरी 1200, तुळशी 100, उरमोडी 550 व अलमट्टी 9 हजार 617 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 5.2 (45), आयर्विन पूल सांगली 7.3 (40) व अंकली पूल हरिपूर 6.7 (45.11).

Web Title: Sparse rainfall in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.