कोरोना निर्दालनासाठी शंभर गावांवर विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:31+5:302021-06-18T04:19:31+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची घनता जास्त असणाऱ्या १०० गावांवर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. दहा तालुक्यांतून प्रत्येकी दहा ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची घनता जास्त असणाऱ्या १०० गावांवर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. दहा तालुक्यांतून प्रत्येकी दहा गावे निश्चित केली आहेत. यापैकी ३१ गावांत ४० हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. सर्वाधिक गंभीर स्थिती वाळवा तालुक्यात आहे.
शहरी भागात रुग्णसंख्या नियंत्रणात असताना ग्रामीण भागात मात्र फैलाव जास्त आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने व आरोग्य विभागाने तालुकानिहाय टार्गेट निश्चित केले आहे. प्रत्येक तालुक्यात जास्त रुग्णसंख्येची दहा गावे निश्चित केली आहेत. तेथे उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. तालुकानिहाय डेंजर झोनमधील गावे : मिरज तालुका - म्हैसाळ, एरंडोली, नरवाड, बेडग, मालगाव, सोनी, माधवनगर, बुधगाव, मल्लेवाडी, कसबे डिग्रज. कवठेमहांकाळ तालुका - कवठेमहांकाळ, कोंगनोळी, थबडेवाडी, ढालगाव, आरेवाडी, रांजणी, कुकटोळी, हिंगणगाव, अलकूड (एस), आगळगाव.
खानापूर तालुका - भाळवणी, कुर्ली, कार्वे, माहुली, वेजेगाव, साळशिंगे, रेणावी, ढवळेश्वर, नागेवाडी, भाग्यनगर. तासगाव तालुका - वडगाव, येळावी, निंबळक, पुणदी, कवठेएकंद, उपळावी, वासुंंबे, बस्तवडे, योगेवाडी, हातनोली.
शिराळा तालुका - मांगले, सागाव, शिराळा, टाकवे, बिऊर, अंत्री बु., कोकरुड, कांदे, भाटशिरगाव, कणदूर. जत तालुका - जत, पांढरेवाडी, बेवनूर, बिळूर, माडग्याळ, काळेवाडी, आसंगी, वळसंग, करेवाडी, जाडरबोबलाद.
पलूस तालुका - बुर्ली, कुंडल, अंकलखोप, दुधोंडी, रामानंदनगर, माळवाडी, सावंतपूर, बांबवडे, किर्लोस्करवाडी, भिलवडी. कडेगाव तालुका - भिकवडी, नेवरी, आंबेगाव, विहापूर, वांगी, देवराष्ट्रे, कडेगाव, अंबक, चिंचणी, तडसर. आटपाडी तालुका - आटपाडी, खरसुंडी, दिघंची, ललिंगीवरे, नेलकरंजी, आंबेवाडी, कामत, गळवेवाडी, बनपूरी, शेटफळे.
चौकट
इस्लामपुरात अडीचशे पार
वाळवा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. इस्लामपूर २८४, आष्टा १३७, येडेनिपाणी १७९, कामेरी ६२, बोरगाव ५४, साटपेवाडी ५२, पेठ ५०, बागणी ५०, नेर्ले ४६, रेठरेधरण ४० अशी रुग्णसंख्या आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी स्वत: तालुक्यावर लक्ष ठेवून आहेत.
कोट
रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांची यादी तयार केली असून तेथील वाढता आलेख कमी करण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. प्रत्येक गावावर लक्ष केंद्रित केले आहे. संस्थात्मक विलगीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर भर देत आहोत.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक