औंढी ग्रामपंचायतीची २२ रोजी विशेष ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:09+5:302021-01-16T04:31:09+5:30
शिराळा : औंढी (ता.शिराळा) येथील राष्ट्रवादीचे सरपंच अभय मधुकर पाटील यांच्या विरुद्धच्या अविश्वास ठरावाबाबत झालेल्या विशेष सभेमध्ये सहा विरुद्ध ...
शिराळा : औंढी (ता.शिराळा) येथील राष्ट्रवादीचे सरपंच अभय मधुकर पाटील यांच्या विरुद्धच्या अविश्वास ठरावाबाबत झालेल्या विशेष सभेमध्ये सहा विरुद्ध एक मताने अविश्वासाचा ठराव मंजूर झाला. हा ठराव ग्रामसभेत मंजूर होणे आवश्यक असल्याने दि. २२ जानेवारी रोजीच्या विशेष ग्रामसभेत मतदान होणार आहे.
दि. २२ रोजी सकाळी ९ ते १ नागरिकांची उपस्थिती, दुपारी १ ते ५ मतदान तसेच मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा दि. २१ डिसेंबर रोजी पार पडली. सरपंच अभय पाटील यांच्या विरोधात १५ डिसेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. यावेळी उपसरपंच शिवाजी कांबळे, दिलीप लोहार, सुमन पाटील, लक्ष्मी चव्हाण, आक्काताई गुरव, पल्लवी खोत असे भाजपाचे सहा सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादीचे एक सदस्य अनुपस्थित राहिले. यावेळी ठरावाच्या बाजूने सहा विरुद्ध एक असे मतदान झाले.
चौकट
तालुक्यात तिसरी ग्रामपंचायत
तालुक्यातील कांदे, मणदूर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचांवर या अगोदर अविश्वास ठरावावर मतदान झाले होते. आता ही तिसरी ग्रामपंचायत आहे ज्यात लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे.