सांगलीतून परराज्यात जाणाऱ्या रातराणी बसेसना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:13+5:302021-07-31T04:27:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शीतल पाटील / सांगली : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यापासून सांगली जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या रातराणी बसेस सुरू ...

Speed of night buses from Sangli to foreign countries | सांगलीतून परराज्यात जाणाऱ्या रातराणी बसेसना गती

सांगलीतून परराज्यात जाणाऱ्या रातराणी बसेसना गती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शीतल पाटील / सांगली : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यापासून सांगली जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या रातराणी बसेस सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील तीन आगारांमधून हैद्राबादला बसेस धावत आहेत, तर राज्यांतर्गत रातराणी सेवाही अविरतपणे सुरू असल्याचे एसटी महामंडळाच्यावतीने सांगण्यात आले.

सांगली जिल्ह्यातून केवळ हैद्राबादसाठीच रातराणीच्या बसेस आहेत. परराज्यातील इतर ठिकाणी रातराणीची सेवा नाही. आटपाडी, शिराळा व सांगली या तीन आगारांमधून हैद्राबादसाठी रातराणी बसेस आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यापासून ही सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. राज्यांतर्गत मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद या सेवाही सुरू आहेत.

चौकट

सध्या सुरू असलेल्या राज्यांतर्गत रातराणी

सांगली - मुंबई

मिरज - मुंबई

सांगली - शेगाव

सांगली - पुणे

सांगली - नाशिक

जत - मुंबई

तासगाव - मुंबई

चौकट

परराज्यात जाणाऱ्या रातराणी

सांगली - हैद्राबाद

शिराळा - हैद्राबाद

आटपाडी - हैद्राबाद

चौकट

कोट

वाहतूक नियंत्रक म्हणतात...

सांगली जिल्ह्यातील विविध आगारांमधून रातराणीच्या बसेस धावत आहेत. परराज्यात केवळ हैद्राबादसाठीच रातराणी सुरू आहे, तर मुंबई, पुणे, नाशिक या मार्गावरही रातराणी बसेस सुरू आहेत.

- अरुण वाघाटे, विभागीय नियंत्रक, सांगली आगार

चौकट

सीमेवरील गावात सोडले जात असल्याने गैरसोय

कर्नाटकातील चिकोडी, अथणीकडे जाण्यासाठी म्हैसाळपर्यंत बसने जावे लागते. तेथून वडाप करून सीमेपर्यंत जात येते. सीमेवरून कर्नाटककडील रिक्षा, वडाप जीपमधून प्रवास करावा लागतो. या मार्गावर मी नेहमीच प्रवास करतो. महिन्याआधी कोरोना चाचणी केल्याशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. आता लस घेतली असेल तर प्रवेश मिळतो.

- शिवप्रसाद कोरे

चौकट

एसटी आगाराच्या तोट्यात वाढ

कोरोनामुळे आधीच सांगली आगाराला तोटा सहन करावा लागला होता. वर्षभरापासून महामंडळाचे नुकसान झाले आहे. एप्रिलपासून एसटी सेवा बंदच होती. महिनाभरापूर्वी सेवा पूर्ववत झाली. आता महापुराने दोन ते अडीच कोटीचे नुकसान झाले आहे. यात फेऱ्या रद्द झाल्यास कार्यालयीन नुकनासीचा समावेश आहे.

Web Title: Speed of night buses from Sangli to foreign countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.