येळावीत रेल्वे पूल स्वच्छतेच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:18 AM2021-06-11T04:18:58+5:302021-06-11T04:18:58+5:30
तासगाव : येळावी (ता. तासगाव) येथे जुना धनगाव रस्ता परिसरात पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी रेल्वे पूल ...
तासगाव : येळावी (ता. तासगाव) येथे जुना धनगाव रस्ता परिसरात पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी रेल्वे पूल स्वच्छतेचे काम तातडीने सुरू होणार असल्याची माहिती विशाल पाटील यांनी दिली. नदी काठाची पूरपरिस्थिती टाळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे ते मिरज रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराने स्वतःच्या सोयीसाठी येळावी परिसरातील नैसर्गिक नाले बुजवले आहेत. या परिसरात नैसर्गिक नाले मुजवल्यामुळे सुमारे ७०० एकर शेती आणि घरांसाठी पुराचा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान झाले होते.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी तहसीलदार कल्पना ढवळे, वसंतदादा कारखान्याचे संचालक विशाल पाटील, उपसरपंच रवींद्र सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य जयदेव भंडारे, दशरथ गावडे, अनिल जाधव यांच्यासह शेतकरी आणि रेल्वेचे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत रेल्वे पूल परिसरातील नैसर्गिक नाले तातडीने खुले करण्याचा निर्णय झाला. बांधकाम पूर्ण झालेल्या पुलाजवळील भराव काढून सपाटे करण्याच्या कामास तातडीने सुरुवात करण्यात करण्याचा निर्णय झाल्याची माहिती विशाल पाटील यांनी यावेळी दिली.