हिट अँड रन; सांगलीत भरधाव मोटारीची दहा दुचाकींना धडक, मोटारचालक पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:27 AM2024-09-19T11:27:48+5:302024-09-19T11:28:00+5:30
सांगली : सांगलीत डाॅ. बापट बाल शाळेजवळ हिट अँड रनचा प्रकार बुधवारी रात्री घडला. बेदरकार मोटारीने विरुद्ध दिशेने येत ...
सांगली : सांगलीत डाॅ. बापट बाल शाळेजवळ हिट अँड रनचा प्रकार बुधवारी रात्री घडला. बेदरकार मोटारीने विरुद्ध दिशेने येत दहा दुचाकींना धडक दिली. चौघेजण किरकोळ जखमी झाले. धडकेनंतर मोटारचालक पसार झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या बसस्थानकाजवळील कोटणीस महाराज मार्गावरून बेदरकार मोटारचालक विरुद्ध दिशेने आला. मोटारीने एका आजोबास उडवले. तेथील पाच दुचाकी उडवल्या. त्यानंतर बापट बाल शाळेजवळील खाऊ गल्लीसमोर अन्य दुचाकी उडवल्या. यात गाडींचा चक्काचुर झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली. अनेकांची पळापळ झाली. काहींनी मोटारीचा पाठलाग केला. मात्र, तो शहर पोलिस ठाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेला.
पांढऱ्या रंगाची चारचाकी असून, त्यात दोघे तरुण होते. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, परिसरात दहशत पसरली. ती माेटार सांगलीचीच असल्याचे अनेकांनी पाहिले. शहर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी येऊन पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची पाहणी करून गुन्हा दाखल करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.