वशी येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:37+5:302021-05-06T04:27:37+5:30
वशी (ता. वाळवा) येथील रक्तदान शिबिरासाठी तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लोकमत न्यूज नेटवर्क वशी : महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या वैश्विक ...
वशी (ता. वाळवा) येथील रक्तदान शिबिरासाठी तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वशी : महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे आलेल्या रक्तदान तुटवड्याची उणीव भरून काढण्याकरिता जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर वशी गावामध्ये आयोजित केले होते. या शिबिरामध्ये अवघ्या तीन तासांत साठ दानशूरांनी रक्तदान केले.
कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन पोतदार व वशी येथील डॉ. महादेव बच्चे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
या रक्तदान शिबिरासाठी वशी, लाडेगाव, इटकरे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, कुरळप, जक्राईवाडी, कुंडलवाडी, पलुस, इस्लामपूर या गावातील युवा दानशूर ६० रक्तदात्यांनी रक्तदान देऊन जीवनदान देण्याचे कार्य या वैश्विक संकटामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराचे आयोजन जनक्रांतीचे यश पाटील, सुमीत देशमुख, गौरव मैत्री, विजय देशमुख, सुनील पाटील, संग्राम पाटील या प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर पार पडले तसेच या रक्तदान शिबिरासाठी वशी गावचे पोलीस पाटील, प्रताप पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आनंदराव पाटील, ग्रामसेवक विष्णू गुरव, उपसरपंच विजय कांबळे तसेच कुरळप पोलीस ठाण्याचे गुप्तचर विभागाचे दादासाहेब ढोले यांनी शिबिरास भेट देऊन मोलाचे योगदान दिले. रक्तदान शिबिर वसंतदादा ब्लड बॅँक मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.