वक्तृत्व, चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: October 19, 2015 10:58 PM2015-10-19T22:58:30+5:302015-10-19T23:45:57+5:30
सांगलीत ‘लोकमत’चे आयोजन : महापालिका क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेते, कुटुंबियांसाठी उपक्रम
सांगली : सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेले वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या मुलांसाठी रविवारी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा झाल्या. येथील दामाणी हायस्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.चित्रकला स्पर्धा पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी, अशा दोन गटात घेण्यात आल्या. पहिली ते पाचवी गटातून शिवानी आनंद मोरे हिने प्रथम, तन्वी प्रशांत जगताप हिने द्वितीय, तर चैत्र भूषण मांजरेकर याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच अभिजित अनिल रूपनर, वरद गजानन बंडगर, सुदर्शन गजानन बंडगर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सहावी ते दहावी गटातून प्रणव विकास सूर्यवंशी याने प्रथम, राधिका रवींद्र पाटील हिने द्वितीय, तर दुर्गेश सचिन चोपडे याने तृतीय क्रमांक पटकावला. शर्वरी सुधाकर चव्हाण, संकेत संजय उपळावीकर, हर्ष प्रदीप माने यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.वक्तृत्व स्पर्धा सहावी ते दहावी व खुला, अशा दोन गटात घेण्यात आल्या. सहावी ते दहावी गटातून राधिका रवींद्र पाटील हिने प्रथम, दुर्गेश सचिन चोपडे याने द्वितीय, तर श्रुती सुधाकर चव्हाण हिने तृतीय क्रमांक पटकावला. या गटातून वैष्णवी संजय मोरे व मानसी मनोहर गडसी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. खुल्या गटातून अभिषेक विकास कुलकर्णी याने प्रथम, विकास सूर्यवंशी यांनी द्वितीय, तर मारुती नवलाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सचिन चोपडे, अजय भंडारी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.चित्रकला स्पर्धेसाठी पी. डी. पाटील, व्ही. आर. पाटील, अश्विनी गायकवाड यांनी, तर वक्तृत्व स्पर्धेसाठी भूषण मांजरेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना ‘लोकमत’च्यावतीने जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्याहस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सचिन चोपडे यांनी स्वागत केले. विकास सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्रीपाद पाटील, प्रताप दुधारे, दत्तात्रय सरगर, दरिबा बंडगर, अनिल रूपनर, कैलास सूर्यवंशी, राम कुंभार, सुधीर दप्तरदार, रवींद्र पोटे, विनोद माने, विनोद गायकवाड, बसाप्पा पट्टणशेट्टी, सुजाता रवींद्र पाटील, त्रिवेणी सचिन चोपडे, प्रतीक्षा विनोद माने यांच्यासह सांगली, मिरज, कुपवाड परिसरातील वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल रासनकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’मुळे विक्रेत्यांना स्वत:ची नवी ओळख
‘लोकमत’ने आजवर वृत्तपत्र विक्रेत्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्यासाठी, तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, सहल, महिला व ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव, आरोग्य शिबिर, स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना स्वत:ची एक नवी ओळख मिळाल्याची भावना अनेक विक्रेत्यांनी यावेळी व्यक्त केली.