शेटफळेत ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:27 AM2021-04-23T04:27:28+5:302021-04-23T04:27:28+5:30
करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने शेटफळे ग्रामपंचायत व दक्षता समितीने दोन दिवस शेटफळे ...
करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने शेटफळे ग्रामपंचायत व दक्षता समितीने दोन दिवस शेटफळे गाव बंद करण्याच्या निर्णय घेतला होता. यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रुग्णालये, मेडिकल व दूध डेअरी वगळता सर्व व्यवहार बंद होते
शेटफळे गावामध्ये मागील आठवड्यापासून कोरोना संसर्ग रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यासाठी ग्रामपंचायत व दक्षता समितीने आटपाडीचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे व नायब तहसीलदार यांच्यासह शेटफळेमध्ये परेड करत नागरिकांची कोरोनाबाबत जनजागृती केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गायकवाड, विजय देवकर, ज्ञानेश्वर वाघमारे, पोलीसपाटील दत्तात्रय क्षीरसागर यांनी नागरिकांना बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे मंगळवार व बुधवार कडकडीत बंदला शेटफळेतील नागरिकांनी उत्स्फूर्त साथ दिली. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, आरोग्याबाबतीत काही अडचणी निर्माण झाल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.