शिक्षणात खेळाला अविभाज्य स्थान हवे । राजू भावसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:51 PM2020-01-11T23:51:13+5:302020-01-11T23:53:41+5:30

राजू भावसार म्हणाले, ‘पदविकेला असताना खेळाकडे वळलो. त्यामुुळे प्रगती झाली’. संचालक सोनवणे म्हणाले, वालचंदच्या विद्यार्थ्यांनी जगभरात ठसा उमटवला आहे. सांगलीतील महापूरकाळात सामाजिक भान जपत मदत केली आहे.

 Sports need an integral place in education | शिक्षणात खेळाला अविभाज्य स्थान हवे । राजू भावसार

सांगलीत वालचंद महाविद्यालयाच्या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी राजू भावसार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी खा. संजय पाटील, उदय बिराजदार, दीपक शिंदे-म्हैसाळकर, डॉ. प्रताप सोनवणे आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे‘वालचंद’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा; महाविद्यालयाचे व्यापारीकरण नको

सांगली : शिक्षणात खेळाला अविभाज्य स्थान मिळालयला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कबड्डीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू राजू भावसार यांनी केले. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दीपक शिंदे-म्हैसाळकर, व्योम लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय बिराजदार, महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रताप सोनवणे यावेळी उपस्थित होते. प्रा. संजय धायगुडे, डॉ. अनिल आगाशे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील, चिदंबर कोटीभास्कर यांनी संयोजन केले.
१९५१ पासूनच्या सर्व बॅचेस, १९९५ ची रौप्यमहोत्सवी बॅच, २००९ ची माहिती तंत्रज्ञान विभागाची बॅच आणि १९७० ची सुवर्णमहोत्सवी बॅच मेळाव्यासाठी विश्ोष उपस्थित होती.

राजू भावसार म्हणाले, ‘पदविकेला असताना खेळाकडे वळलो. त्यामुुळे प्रगती झाली’. संचालक सोनवणे म्हणाले, वालचंदच्या विद्यार्थ्यांनी जगभरात ठसा उमटवला आहे. सांगलीतील महापूरकाळात सामाजिक भान जपत मदत केली आहे. या महाविद्यालयाने गुणवत्ता ठेवली आहे. म्हणूनच जगभरात विद्यार्थ्यांचा लौकिक आहे’.
यावेळी गटचर्चा व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. यावेळी डॉ. डी. बी. कुलकर्णी, राजेंद्र भोसले, रवी पुरोहित, प्रा. अनिल सुर्वे, नारायण आपटे आदी उपस्थित होते. डॉ. अमृता आगाशे, कौस्तुभ कुलकर्णी, मेघा आगाशे यांनी सूत्रसंचालन केले.

 

Web Title:  Sports need an integral place in education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.