मिरजेतील खणीत औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 02:19 PM2019-12-09T14:19:22+5:302019-12-09T14:21:14+5:30
मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे सलग दुसऱ्यादिवशी हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत होते. मृत मासे बाहेर काढून विल्हेवाट लावणे शक्य नसल्याने व मृत माशांची दुर्गंधी कमी करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने खणीत औषध फवारणी केली.
मिरज : मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे सलग दुसऱ्यादिवशी हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत होते. मृत मासे बाहेर काढून विल्हेवाट लावणे शक्य नसल्याने व मृत माशांची दुर्गंधी कमी करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने खणीत औषध फवारणी केली.
संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत गेल्या दोन दिवसांत हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. पाणी दूषित झाल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. मृत माशांचा खच पाण्याबाहेर काढणे शक्य नसल्याने आरोग्य विभागाने खणीत बोटीच्या साहाय्याने औषध फवारणी केली.
खणीच्या काठावर मोठ्या वसाहती असून, नागरिक कचरा आणि सांडपाणी टाकत असल्याने खणीतील दूषित पाण्याचा जलचरांना धोका निर्माण झाला आहे. मात्र माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. काळ््या खणीत मासेमारी करणारा ठेकेदार अजूनही गायब असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.