सांगलीत पावसाचा शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:12+5:302021-03-19T04:25:12+5:30
सांगली : शहर व परिसरात गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले असून, सायंकाळी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. दुसरीकडे किमान ...
सांगली : शहर व परिसरात गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले असून, सायंकाळी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. दुसरीकडे किमान तापमानात मोठी वाढ होऊन पारा २४ अंशांवर गेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार चार दिवसांत पावसाची चिन्हे आहेत.
हवामान खात्याने नोंदलेल्या निरीक्षणानुसार शुक्रवार व शनिवारी ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. त्यानंतर सलग चार दिवस पावसाची चिन्हे आहेत. जिल्ह्याच्या सरासरी कमाल व किमान तापमानातही बदल होत आहेत. गुरुवारी कमाल तापमान ३६ अंशांवर स्थिर राहिले, तर किमान तापमानात २ अंशांची वाढ होऊन पारा २४ अंशांवर गेला आहे. पारा सरासरीपेक्षा ४ अंशाने अधिक असल्याने रात्रीचा उकाडा वाढणार आहे. येत्या सहा दिवसात किमान व कमाल तापमानात घट होणार आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होऊ शकते.