एसटीने हंगामी भाडेवाढ टाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:09 AM2019-04-16T00:09:41+5:302019-04-16T00:09:53+5:30

सांगली : खासगी बसेसकडील प्रवासी खेचण्यासाठी उन्हाळी सुटीतील हंगामी भाडेवाढ टाळण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. एसटीच्या ...

ST avoided seasonal fare | एसटीने हंगामी भाडेवाढ टाळली

एसटीने हंगामी भाडेवाढ टाळली

Next

सांगली : खासगी बसेसकडील प्रवासी खेचण्यासाठी उन्हाळी सुटीतील हंगामी भाडेवाढ टाळण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. एसटीच्या सांगली विभागाने जिल्ह्यातील १० आगारांतून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अन्य मार्गावर १२७ जादा बसेस सोडल्या असून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर रोज २० ते २५ लाखांपर्यंत उत्पन्नवाढीची जबाबदारीही टाकली आहे.
शाळांना उन्हाळ्याची सुटी लागल्यानंतर एसटीकडे प्रवाशांची नेहमीच गर्दी होत होती. या कालावधीत हंगामी १० ते १५ टक्के भाडेवाढ करून एसटीचे उत्पन्न वाढविण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. याच धर्तीवर दीपावली, गणेशोत्सवावेळी एसटीची हंगामी भाडेवाढ होत होती. या हंगामी भाडेवाढीमुळे खासगी बसेसपेक्षाही एसटीचे भाडे जास्त असल्यामुळे प्रवासी खासगी बसेसला पसंती देत होते. खासगी प्रवासी वाहतूकदारही प्रवासी खेचून घेत. भाडेवाढीचा फायदा होण्याऐवजी प्रवासी संख्याच घटू लागल्यामुळेच यावेळी एसटी महामंडळाने उन्हाळी सुटीमधील हंगामी भाडेवाढ केली नाही. या निर्णयामुळे प्रवाशांसह एसटीचे उत्पन्न वाढण्यासही फायदा होणार आहे.
उन्हाळी सुटीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या सांगली विभागाने जिल्'ातून रोज १२७ बसेसच्या ६१६ फेºया करण्याचे नियोजन केले आहे. या जादा फेºया दि. १४ एप्रिल २०१९ ते २५ जून २०१९ अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. औरंगाबाद, मुंबई, बोरिवली, स्वारगेट, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, इचलकरंजी, कºहाड, सातारा, नाशिक, ठाणे, महाबळेश्वर, रत्नागिरी, दापोली, हिंगोली आदी मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी २२ एप्रिलला ३६७ बसेस
लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांसह मतदान यंत्रे केंद्रावर पोहोचविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी दि. २२ एप्रिल रोजी ३६७ एसटी बसेस आरक्षित केल्या आहेत. पुन्हा दि. २३ एप्रिल रोजी मतदान यंत्रासह कर्मचाºयांना परत आणण्यासाठी ३६७ बसेस आरक्षित केल्या आहेत. यामध्ये सांगली आगार ४८ बसेस, मिरज ५४, इस्लामपूर ३७, शिराळा ५२, पलूस ४४, विटा ५५, तासगाव ३७ आणि जत ४० बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती सांगली विभागाच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली.

 

 

 

Web Title: ST avoided seasonal fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.