शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला एसटी कामगार सेनेचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:24 AM2020-12-08T04:24:14+5:302020-12-08T04:24:14+5:30
शेतकरीविरोधी कायदे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीला घेराव घालून गेल्या १२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ...
शेतकरीविरोधी कायदे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीला घेराव घालून गेल्या १२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. तरीही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नसल्याने ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हे नेहमीच एसटी महामंडळावर प्रेम करीत असतात व आर्थिक उत्पन्नदेखील शेतकऱ्यांकडून महामंडळास मिळत असते. शेतकरीच अडचणीत आला, तर महामंडळ आणि कर्मचारीदेखील प्रभावित होऊ शकतात. एसटी महामंडळातील ८० टक्के कर्मचारी शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने देशभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आणि भारत बंद आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत आणि सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी जाहीर केले आहे.
केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी, सभासद कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून काळ्या फिती लावून कामगीरी बजावत आपला निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.