जिल्हाभरात तालुकास्तरावरून एसटी सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:32+5:302021-06-02T04:20:32+5:30
सांगली : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सांगलीपर्यंत एसटी सेवा सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तशा सूचना दिल्या. ...
सांगली : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सांगलीपर्यंत एसटी सेवा सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तशा सूचना दिल्या.
प्रभारी विभागीय नियंत्रक अरुण वाघाटे यांनी सांगितले की, सांगलीतून प्रत्येक तालुक्याला सकाळी सात वाजल्यापासून एसटी निघेल. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याच्या शहरातून सांगलीसाठी एसटी सुटेल. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत वाहतूक सुरू राहील. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने एसटी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, एसटीचा ७३ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी साजरा झाला. सांगली स्थानकात प्रवासी डी. ए. कांबळे यांच्याहस्ते केक कापण्यात आला. यावेळी वाघाटे यांच्यासह लेखाधिकारी एम. पी. तेलवेकर, कामगार अधिकारी दिनेश राठोड, आगार व्यवस्थापक दीपक हेतंबे, राजू बेंद्रे, आनंदा पाटील, उमेश पाटील, स्वप्नील आवटे, सतीश शेंडगे, महेश पाटील, अनिता सरगर, विजय चौगुले, आर. डी. पाटील, आर. डी. चव्हाण, दीनानाथ डवरी, महेंद्रसिंग ठाकूर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.