शिराळा तालुक्यात बससेेवा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:28 AM2021-01-25T04:28:21+5:302021-01-25T04:28:21+5:30
शिराळा : तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. बस सेवा सुरु करण्याची मागणी शिराळा तालुका व्यापारी संघटनेमार्फत करण्यात आली. याबाबत शिराळा ...
शिराळा
: तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. बस सेवा सुरु करण्याची मागणी शिराळा तालुका व्यापारी संघटनेमार्फत करण्यात आली. याबाबत शिराळा आगार प्रमुख विद्या कदम, नगराध्यक्षा सुनीता निकम, नायब तहसीलदार अरुण कोकाटे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाला आहे. राज्य शासन सुद्धा सर्व क्षेत्रे खुली करु लागली आहेत. व्यापाऱ्यांच्या आग्रही मागणीनुसार शिराळा नगरपंचायतीने दर सोमवार व गुरुवारचा शिराळा येथील आठवडी बाजारही सुरू केलेला आहे. परंतु शिराळा भागातील एस. टी. सेवा कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकरी वर्ग आपला माल विक्रीसाठी किंवा स्वतःच्या जीवनावश्यक सेवा खरेदीसाठी येऊ शकत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शिराळा बाजारपेठेत ये-जा करण्यासाठी एस.टी. प्रवास सेवा एकमेव स्वस्त व परवडणारी वाहतूक सेवा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा विचार करत ग्रामीण भागातील एस.टी. सेवा सुरू करावी अशी मागणी केली आहे.
हे निवेदन मुख्याधिकारी योगेश पाटील यांना देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, अविनाश चितूरकर, सुनील कदम, महेश चरणकर, सचिन पांगे, नगरसेवक संजय हिरवडेकर, गणेश आवटे आदी उपस्थित होते.