उखळू ते उदगिरी जंगल सफारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:26+5:302021-02-15T04:24:26+5:30
शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्याने सुरू होत असलेल्या चांदोली, उखळू ते उदगिरी जंगल सफारी मार्गाची सुरुवात रविवारी जलसंपदा ...
शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्याने सुरू होत असलेल्या चांदोली, उखळू ते उदगिरी जंगल सफारी मार्गाची सुरुवात रविवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी मार्गदर्शक फलकाचे अनावरण व प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचे उद्घाटन केले.
यावेळी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपअभियंता मिलिंद किटवाडकर, महेश चव्हाण, शाखा अभियंता तानाजी धामणकर, जिल्हा वनसंरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वन अधिकारी महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल जी. एस. लंगोटे, वनपाल डी. के. यमगर आदी उपस्थित होते.
चाैकट
सफरीचा वाहन मार्ग
झोळंबी व उदगिरी या दोन्ही मार्गावरुन सफर होणार आहे. यामध्ये जनाईवाडी टॉवर, तांबवे टॉवर, जनीचा आंबा, उदगिरी मंदिर, झोळंबी लपनगृह, झोळंबी सडा, कोकण दर्शन, विठलाई मंदिर, शेवताई मंदिर ही ठिकाणे पाहता येणार आहेत. सफारीसाठी प्रवेश वेळ सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. गुरुवारी सफारी बंद असेल. वारणावती (ता. शिराळा) येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात शुल्क भरून ही सुविधा घेेेता येतील.
फोटो-१४शिराळा३
फोटो : शिराळा तालुक्यातील चांदोली येथील उखळू ते उदगिरी जंगल सफारी मार्गाची सुरुवात जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आली.