आधारभूत धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:22+5:302021-04-21T04:26:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २०२०-२१ च्या रब्बी हंगामातील आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २०२०-२१ च्या रब्बी हंगामातील आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मका व ज्वारी खरेदी केंद्रात धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्यांनी विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत संपर्क साधावा, असे आवाहन सभापती राहुल साळुंखे यांनी केले.
सभापती साळुंखे म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू आहे. रब्बी पणन हंगामातील मका व ज्वारी धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी प्रथम ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येऊन शेतकऱ्यांनी एनइएमएलच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. त्यासाठी नोंदणी करण्यास येताना शेतकऱ्यांनी मका किंवा ज्वारीची रब्बी नोंद असलेला २०२०-२१ चा सातबारा व ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आदी घेऊन येऊन रजिस्टर नोंदणी करावी. त्यानंतरच आपला शेती माल खरेदी केला जाईल. ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२१ आहे. नोंदणी करण्यासाठी येताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही सभापती राहुल साळुंखे यांनी सांगितले.