नाट्यगृहे सुरू करा, राज्य नाट्य स्पर्धा जाहीर करा-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:59+5:302021-09-07T04:31:59+5:30
फोटो आहे मिरज : मुख्यमंत्र्यांनी कलाकारांना पाच नोव्हेंबरपासून राज्यात नाट्यगृहे सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात नाट्यगृहे ...
फोटो आहे
मिरज : मुख्यमंत्र्यांनी कलाकारांना पाच नोव्हेंबरपासून राज्यात नाट्यगृहे सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात नाट्यगृहे सुरू करावीत. गतवर्षी रद्द झालेल्या राज्य नाट्य स्पर्धा घ्याव्यात, अशी मागणी भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गीत, संगीताच्या मैफिली, तमाशे, शाहिरी, लोकनाट्य यासह सर्व सांस्कृतिक व कलेचे कार्यक्रम गणेशोत्सवापासून सुरू करावेत, कोविड साथीमुळे अडचणीत आलेल्या सर्व कलाकारांना आर्थिक मदत करावी, वृद्ध कलाकार व मृत कलाकारांच्या कुटुंबातील व्यक्तींना वाढीव मानधन मिळावे, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे देण्यात आले.
यावेळी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ओमकार शुक्ल, जिल्हाप्रमुख अपर्णा गोसावी, लेखक राम कुलकर्णी, सौ. माणिक जोशी, गोवर्धन हसबनीस, सचिन पारिख, दिगंबर कुलकर्णी, रश्मी सावंत, अनुजा कुलकर्णी, सायली हिप्परगी, नीलेश साठे, आर्टिस्ट असोसिएशनचे अतुल शहा, पूजा शिंगाडे, जानकी जोशी, किरण ठाणेदार उपस्थित होते.