ग्रामीण महिला बचत गटांसाठी राज्यस्तरीय भरारी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:22 AM2021-04-03T04:22:22+5:302021-04-03T04:22:22+5:30
सांगली : महिला बचत गटांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांसाठी रोख बक्षिसे आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...
सांगली : महिला बचत गटांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांसाठी रोख बक्षिसे आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स, मिळून साऱ्याजणी, चैतन्य संस्था व सारथी ग्रामीण महिला स्वयंसिध्द संघाने भरारी ग्रामीण महिला बचत गट स्पर्धा आयोजित केली आहे. संयोजक डॉ. सुजाता बरगाले यांनी ही माहिती दिली.
स्पर्धेसाठी मोफत प्रवेश आहे. गटाला मिळालेले पुरस्कार, प्रमाणपत्रे, बातम्या, कात्रणे, व्यवसाय, उत्पादनांबद्दलचे फोटो, सामाजिक उपक्रम इत्यादी माहिती द्यायची आहे. सदस्यांच्या व्यक्तिगत पुरस्कारांची माहितीही देता येईल. पहिली तीन रोख बक्षिसे व तीन उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत. मोजक्या महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ३० एप्रिलपर्यंत स्पर्धेत सहभागी होता येईल. अर्ज टपालाने, प्रत्यक्ष किंवा कुरियरमार्फत पाठवता येतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्पर्धा आयोजित केल्याचे डॉ. बरगाले म्हणाल्या. सहभागासाठी सांगलीत आमराईजवळ जैन बोर्डिंग येथे संपर्क साधता येईल.