राज्यस्तरीय कामगार केसरी कुस्ती स्पर्धा उद्या सांगलीत; चांदीची गदा, मानाच्या पट्ट्यासह ७५ हजाराचे बक्षीस

By अशोक डोंबाळे | Published: January 24, 2024 07:11 PM2024-01-24T19:11:21+5:302024-01-24T19:12:43+5:30

राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धा दि. २६ व २७ जानेवारी रोजी सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे.

State Level Labor Kesari Wrestling Tournament Tomorrow in Sangli A reward of 75 thousand with silver mace, belt of honour | राज्यस्तरीय कामगार केसरी कुस्ती स्पर्धा उद्या सांगलीत; चांदीची गदा, मानाच्या पट्ट्यासह ७५ हजाराचे बक्षीस

राज्यस्तरीय कामगार केसरी कुस्ती स्पर्धा उद्या सांगलीत; चांदीची गदा, मानाच्या पट्ट्यासह ७५ हजाराचे बक्षीस

सांगली: राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धा दि. २६ व २७ जानेवारी रोजी सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या नोंदित कंपन्या, कारखाने इत्यादी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगार व त्यांच्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. स्पर्धेचे उदघाटन राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे, अशी माहिती कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी दिली.

संभाजी पवार म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुल, सांगली-मिरज रोड सांगली येथे या स्पर्धा होतील. राज्य व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या नियमांप्रमाणे स्पर्धा होणार असून कुस्ती सामने मॅटवर खेळवले जाणार आहेत. कामगार केसरी आणि कुमार केसरी किताब पटकवणाऱ्या कुस्तीगिरांना पारितोषिक रक्कमेसह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. कामगार केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ७५ हजार रूपये, व्दितीय पारितोषिक ५० हजार रूपये, तृतीय पारितोषिक ३५ हजार रूपये व उत्तेजनार्थ पारितोषिक २०हजार रूपये आहे. कामगार पाल्यांसाठी आयोजित कुमार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५१ हजार रूपये, व्दितीय पारितोषिक ३५ हजार रूपये, तृतीय पारितोषिक २० हजार रूपये व उत्तेजनार्थ पारितोषिक १० हजार रूपये आहे. तसेच विविध पाच वजनी गटात सामने होणार असून विजेत्यांना २५ हजार ते १० हजार रूपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेचा पारिलेषिक वितरण समारंभ मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते २७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहेत.

Web Title: State Level Labor Kesari Wrestling Tournament Tomorrow in Sangli A reward of 75 thousand with silver mace, belt of honour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.