शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जयंत पाटील यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:53+5:302021-01-09T04:21:53+5:30
इस्लामपूर : राज्यातील अकृषी विद्यापीठ व अशासकीय महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा व सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती ...
इस्लामपूर : राज्यातील अकृषी विद्यापीठ व अशासकीय महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा व सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्यात यावेत, या मागणीचे निवेदन श्रीमती कुसुमताई पाटील कन्या महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिले.
राज्यातील सर्व शासकीय व अशासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ देण्यात आले आहेत; मात्र अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ अद्याप मिळालेला नाही. तसेच अश्वासित प्रगती योजनेअंतर्गत २४ वर्षांनंतर मिळणारा पदोन्नतीचा लाभदेखील तांत्रिक बाबीमध्ये अडकला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती जयंत पाटील यांना करण्यात आली.
यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजन शिंदे, मनोज मोगरे, हरिश्चंद्र चावरे, मुबारक पट्टेकरी, रफिक मुल्ला, गौतम पाटील, राहुल खोत, बाबासाहेब मदने उपस्थित होते.
फोटो -०८०२२०२१-आयएसएलएम-कुसुमताई न्यूज
फोटो ओळ : इस्लामपूर येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले.