रहा निर्धास्त ! सांगलीत दिला जातो मानसिक आधार... अडीच हजार लोकांनी घेतला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 07:15 PM2020-04-27T19:15:06+5:302020-04-27T19:15:55+5:30

सांगली , : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात अडकले असून ...

Stay tuned! Mental support is given in Sangli ... Two and a half thousand people took advantage | रहा निर्धास्त ! सांगलीत दिला जातो मानसिक आधार... अडीच हजार लोकांनी घेतला फायदा

रहा निर्धास्त ! सांगलीत दिला जातो मानसिक आधार... अडीच हजार लोकांनी घेतला फायदा

googlenewsNext
ठळक मुद्देमानसिक समुपदेशनाचा अडीच हजार कामगारांना लाभ- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे

सांगली, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात अडकले असून ते जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी निवारागृहामध्ये सध्या रहात आहेत. त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविध पुरविल्या जात आहेत. याच जोडीला जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांद्वारे मानसिक आजाराचे समुपदेशन करण्याचे काम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अडीच हजार स्थलांतरीत मजूरांचे तसेच तमीळहून येणाऱ्या मार्केटिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सेवेचा वैयक्तिक लाभ मिळाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील निवारागृहात राहणाऱ्या नागरिकांना घरापासून दूर राहणे, आर्थिक कुचंबणा, चिंता, अस्वस्थाता वाटणे, भूक न लागणे, चिडचिड वाढणे, झोप न येणे, जवळच्या नातलगांना काहीतरी होईल या भीतीने तसेच अति काळजीने बेचैन होणे, कोविड-19 या आजाराची सुप्त भिती यामुळे या मजूरांना अनेक मानसिक व्याधिंना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांद्वारे या स्थलांतरीत मजूरांना समुदेशन देण्याचे कामही जिल्ह्यातील सुरु असल्याचीही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे. स्थलांतरीत कामगारांसाठी संचालक (मानसिक आरोग्य) आरोग्य सेवा, मुंबई व आयुक्त आरोग्य सेवा,
महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडील सूचनेनूसार जिल्हा मानसिक आरोगय कार्यक्रमांतील सदस्यांबरोबर सांगली जिल्ह्यातील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र या मध्ये कार्यरत असणारे समुपदेशक, प्रयोग शाहा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स यांना मानसिक समुपदशेन करण्यासाठी सामावून घेण्यात आले आहे. या संदर्भात दिनांक 20 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली येथून व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आले. या कॉन्फरन्स मधून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांनी कोरोनामध्ये घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. मानसशास्त्रज्ञ डॉ. माणिकराव सुर्यवंशी यांनी संस्थालतरीत कामगारांचे प्रकार जसे की बाहेरच्या जिल्ह्यातुन तसेच परराज्यातून आलेले ऊसतोड कामगार, शिक्षणासाठी आलेले राज्याबाहेरील तसेच
जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी, कोविड-19 मध्ये लहान मुले, गरोदर महिला, वृध्द व्यक्ती यांच्यामध्ये निर्माण होणारी
मानसशास्त्रीय लक्षणे व घ्यावयाची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, सांगलीचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विवेक सावंत यांनी सोशल मिडिया व संपर्क कौशल्य यावर मार्गदर्शन केले, समुपदेशक अविनाश शिंदे यांनी कोरोनातील सामाजिक अंतर, रिपोटिंग अहवाल यावर मार्गदर्शन केले.

आतापर्यंत अडीच हजार स्थलांतरीत मजूरांचे मानसिक आजाराबाबतचे समुपदेशन पूर्ण झाले आहे व ते यापुढेही सुरु राहणार आहे. या शिवाय बालसुधारगृह, आश्रामशाळा, धर्मशाळा, वृध्दाश्रम, पोलीस, आरोग्य कर्मचारी, ओपिडी मधील रुग्ण, ट्रक ड्रायव्हर, हमाल, विलगीकरण कक्ष, गृह अलगीकरणामध्ये असणाऱ्या व्यक्तींचे कोविड-19 आजाराविषयी व मानसिक समुपदशेन सुरु आहे. तसेच 24 तास समुपदेशन सेवा सुरु आहे. त्यासाठी सपर्क करण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉ. गजानन साकेकर मो.क्रमांक झ्र 9175577741, डॉ. शितल शिंदे मो.क्रमांक झ्र 9922397582, मानसशास्त्रज्ञ डॉ. माणिकराव सुर्यवंशी मो.क्रमांक झ्र 9604965701, समुपदेशक श्री
अविनाश शिंदे मो.क्रमांक 8007259119, मनोविकृती परिचारक लॉरेन्स आवळे मो.क्रमांक 9834151603 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

 

Web Title: Stay tuned! Mental support is given in Sangli ... Two and a half thousand people took advantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.