मिरजेत गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:19 AM2021-07-21T04:19:17+5:302021-07-21T04:19:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मिरजेत छापा टाकून सहाचाकी वाहनासह गोवा बनावटीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मिरजेत छापा टाकून सहाचाकी वाहनासह गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एकाला अटक करण्यात आली.
राज्य उत्पादनाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांना मिरजेत मालवाहतूक वाहनातून दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिरज बसस्थानक परिसरात सापळा रचला. यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटी दारूचे २९८ बाॅक्स आढळून आले. पथकाने गणेश महादेव पिंगळे (वय २५, रा. गवंडी गल्ली, खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवस कोठडी सुनावण्यात आली.
गोवा बनावटीचे मद्य तसेच बेकायदेशीर मद्य विक्रीबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकांशी संपर्क साधवा, असे आवाहन अधीक्षक देशमुख यांनी केले आहे.