सांगली मार्केट यार्डात आजपासून बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:33 PM2018-10-23T23:33:40+5:302018-10-23T23:34:07+5:30
सांगली : येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाऱ्यांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसांविरोधात व्यापाºयांनी बुधवारी २४ आॅक्टोबरपासून ...
सांगली : येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाऱ्यांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसांविरोधात व्यापाºयांनी बुधवारी २४ आॅक्टोबरपासून बेमुदत बंद पुकारला आहे, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, उद्योजक माधव कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, सांगली मार्केट यार्डातील १३०० व्यापाºयांना केंद्रीय सेवा व कर कार्यालयाकडून ३० जुलै २०१२ पासूनच्या अडत व कमिशनवरील सेवाकर भरण्याच्या नोटिसा आल्या आहेत. नोटिशीनुसार दंड भरण्याची व दंड न भरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात फक्त सांगलीतच व्यापाºयांना सेवाकराच्या नोटिसा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांनी पंधरा दिवसांपूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत सेवाकराच्या अन्यायकारक नोटिसीविरोधात दाद मागितली होती. त्यांनी कारवाई न करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही अधिकाºयांकडून कारवाई सुरू केल्यानेच याच्या निषेधार्थ मार्केट यार्ड व्यापाºयांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे.
कायदा हा सर्वत्र समान असला पाहिजे, मात्र संपूर्ण देशात कुठेही नोटिसा न देता केवळ सांगलीत अशाप्रकारच्या नोटिसा देऊन अधिकाºयांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. सणासुदीच्या काळातच व्यापाºयांना स्वत:चे नुकसान करून बंदचे आंदोलन नाईलाजास्तव पुकारावे लागत आहे. वास्तविक येथील व्यापाºयांना किती कमिशन घ्यायचे हे ठरलेले आहे. एक रुपयासुद्धा शेतकºयांकडून जादा घेतला तर, आमचे परवाने रद्द होऊ शकतात. पणन विभागाने त्यासंदर्भात आदेशच दिले आहेत. तरीही जीएसटी विभाग आमच्याकडून अशाप्रकारच्या अपेक्षा का बाळगत आहे. पणनचा कोणताही आदेश नसताना व्यापारी कोणताही कर कसा गोळा करू शकतात? त्यामुळे संबंधित अधिकाºयांनी त्यांनी मनमानी बंद करावी. बुधवारी सायंकाळी पुन्हा बैठक होऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे, असे ते म्हणाले.
कोणाची सुपारी : घेतली आहे?
संबंधित वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाºयांनी सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षांची सुपारी घेतली आहे का, अशी आम्हाला शंका वाटत आहे, असे माधव कुलकर्णी म्हणाले. मंत्री, खासदार, आमदार यांचे आदेशही न मानणाºया या अधिकाºयांच्या कारवाई करण्यामागे नेमके गणित काय आहे, याचा शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.