आटपाडीत नागरिकांचा रास्ता रोको-विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:37 PM2019-01-31T23:37:27+5:302019-01-31T23:38:52+5:30

आटपाडी : आटपाडी येथे सेजल मगर या शाळकरी विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस जबाबदार घटकांवर करवाई केली ...

Stop the path of Atpadi citizens: Accidental death of the student | आटपाडीत नागरिकांचा रास्ता रोको-विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

आटपाडीत नागरिकांचा रास्ता रोको-विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

Next
ठळक मुद्देजबाबदार घटकांवर कारवाईची प्रशासनाकडून ग्वाही

आटपाडी : आटपाडी येथे सेजल मगर या शाळकरी विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस जबाबदार घटकांवर करवाई केली जावी, या मागणीसाठी गुरूवारी साई मंदिर चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधून मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे, तसेच दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सोमवार, दि. २८ जानेवारी रोजी मायाक्कानगरजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत सेजल मगर याचा मृत्यू झाला होता. शहरातील रस्त्याची खुदाई झालेल्या रहदारीच्या ठिकाणची कामे अपूर्ण आहेत, त्यामुळे हा अपघात झाला. यासाठी जबाबदारांवर कारवाईची मागणी करत आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. आर. काटकर, उपअभियंता सुभाष पाटील, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी चर्चा केली.सेजल मगर याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून रस्ते खुदाई झालेल्या रहदारीच्या ठिकाणाची कामे लवकर पूर्ण करुन वाहतुकीचा अडथळा दूर करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला देण्यात आली. यानंतर आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात स्वाभिमानी आघाडीचे नेते भारत पाटील, आनंदराव पाटील, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात, प्रदीप पाटील, अशोक लवटे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जगताप, मुरलीधर पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते बंडोपंत देशमुख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डी. एम. पाटील, उत्तम बालटे, अभिमन्यू विभुते, राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. ए. पाटील, चंद्रकांत दौंडे, विनायक पाटील, राजेंद्र चव्हाण, दीपक देशमुख, व्ही. एन. देशमुख, कैलास भिंगे, मनोज मरगळे आदी सहभागी झाले होते.

राष्टवादीकडून निवेदन
रस्ते अपघातातील सेजल मगर याच्या मृत्यूप्रकरणी ट्रकचालक व रस्त्याचे ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आटपाडी शहर अध्यक्ष संभाजीराव पाटील व कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन तहसीलदार सचिन लंगुटे यांना दिले.

आटपाडी येथे विद्यार्थ्याचा अपघातील मृत्यू झाला असून, त्यास जबाबदार घटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध केला.

Web Title: Stop the path of Atpadi citizens: Accidental death of the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.