भिकवडी खुर्दला येरळेतील वाळू तस्करी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:44+5:302021-09-10T04:32:44+5:30

वांगी : भिकवडी खुर्द (ता. कडेगाव) येथील येरळा नदीतून सध्या वाळू तस्करी सुरू असून माफियांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ...

Stop sand smuggling from Bhikwadi Khurd to Yerle | भिकवडी खुर्दला येरळेतील वाळू तस्करी रोखा

भिकवडी खुर्दला येरळेतील वाळू तस्करी रोखा

Next

वांगी : भिकवडी खुर्द (ता. कडेगाव) येथील येरळा नदीतून सध्या वाळू तस्करी सुरू असून माफियांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

येरळा नदीच्या वाळूला सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांकडून मोठी मागणी आहे. परिणामी येथील वाळूला सोन्याचा भाव मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक तरुण झटपट श्रीमंत होण्यासाठी बेकायदा वाळू चोरीत उतरले आहेत.

नदीतून जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, पिकअप आदी वाहनांच्या साहाय्याने बेसुमार अवैध वाळू उपसा केला जात आहे. जेसीबीच्या साहाय्याने बेकायदा वाळू उपसा केला जात असल्याने नदीपात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यावर जमीन वाहून जाण्याचा प्रकार घडत आहे. महसूल प्रशासनाने केवळ जुजबी कारवाई करण्यापेक्षा तालुक्यातील वाळू तस्करी कायमची बंद करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चौकट

प्रत्येक गावात कारवाई करा

वांगी (ता. कडेगाव) येथे नदीपात्राचा पंचनामा करून संबंधित वाळू तस्करांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आहे. अशीच कारवाई तालुक्यातील प्रत्येक गावातील वाळू तस्करांवर व्हावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Stop sand smuggling from Bhikwadi Khurd to Yerle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.