केंद्र शासनाकडून संविधानाची गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:45+5:302021-04-15T04:25:45+5:30

इस्लामपूर : केंद्र शासन संविधानाची गळचेपी करीत आहे. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनास बसले आहेत, त्यांचे म्हणणे ऐकायला सरकारकडे वेळ नाही. ...

The strangulation of the Constitution by the Central Government | केंद्र शासनाकडून संविधानाची गळचेपी

केंद्र शासनाकडून संविधानाची गळचेपी

Next

इस्लामपूर : केंद्र शासन संविधानाची गळचेपी करीत आहे. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनास बसले आहेत, त्यांचे म्हणणे ऐकायला सरकारकडे वेळ नाही. महाराष्ट्राला केंद्राकडून देण्यात येणारी लस, राज्यपाल नियुक्त आमदार निवड, एससी., ओबीसी, एनटी शिष्यवृत्ती देण्यात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे यांनी केला.

राष्ट्रवादीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३० व्या जयंती दिन संविधान बचाव दिन म्हणून साजरा करण्यात आला.

तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास तर प्रदेश चिटणीस अ‍ॅड. चिमण डांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, कमल पाटील, संग्राम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले. प्रतिभा पाटील यांनी आभार मानले.

यावेळी एम. जी. पाटील, संजय पाटील, खंडेराव जाधव, सुभाष सूर्यवंशी, सचिन कोळी, आयुब हवालदार उपस्थित होते.

Web Title: The strangulation of the Constitution by the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.