कोरोना लसीविषयी मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:26 AM2021-05-09T04:26:09+5:302021-05-09T04:26:09+5:30

सांगली : कोरोना लसीच्या टंचाईवर मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय होणार आहे. उपलब्ध लसीतून दुसरा डोस देण्याला प्राधान्य राहील. लसीसाठी ...

Strategic decision on corona vaccine at cabinet meeting | कोरोना लसीविषयी मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय

कोरोना लसीविषयी मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय

Next

सांगली : कोरोना लसीच्या टंचाईवर मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय होणार आहे. उपलब्ध लसीतून दुसरा डोस देण्याला प्राधान्य राहील. लसीसाठी महाराष्ट्राला झुकते माप द्यावे, अशी मागणी असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी येथे पत्रकारांना दिली. कोरोनाबाधितांसाठी व्हेन्टिलेटरचा सरसकट वापर चुकीचा आहे. त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करुन व्यूहरचना ठरविणार असल्याचेही ते म्हणाले.

सांगली जिल्ह्यात ऑक्सिजनचा कोठेही तुटवडा नसल्याचा व १२०० रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.

ते म्हणाले की, ऑक्सिजन बेड आहेत, पण ऑक्सिजनचा आणि व्हेन्टिलेटरचा वापर चुकत आहे. त्यावर निर्बंध गरजेचे आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांसाठीच व्हेन्टिलेटर वापरावे. ऑक्सिजन टंचाई कमी करण्यासाठी पुण्यातून दररोज ४४ टन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. मिरज कोविड रुग्णालय व अन्य खासगी रुग्णालयांत मिळून १२०० रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. नियोजन समितीच्या अंदाजपत्रकातून १० टक्के निधी कोविड कामांसाठी राखीव असून त्याद्वारे ३२ कोटी रुपये मिळतील. मिरज, जत, माडग्याळ, चिंचणी-वांगी, आटपाडी, विटा आदी रुग्णालयांत जंबो सिलिंडर वाढविणार आहोत. येत्या शनिवारपर्यंत ५० व्हेन्टिलेटर मिळतील, त्यातून मिरज कोविड रुग्णालयाला २५, सांगली रुग्णालयाला २० दिले जातील. नियोजन समितीच्या निधीतून १५ व्हेन्टिलेटर मिळतील. सर्वाधिक व्हेन्टिलेटर असणाऱ्या राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये सांगलीचा समावेश आहे. घरातच उपचार घेणारे रुग्ण प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात येतात, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

चौकट

भारतीमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

सांगली व पुण्यात भारती रुग्णालयांत प्रत्येकी साडेचार कोटी रुपये खर्चाचे तीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रत्येक प्रकल्पात मिनिटाला ५०० लिटर द्रवरुप ऑक्सिजन निर्मिती होईल. महिनाभरात प्रकल्प कार्यान्वित होतील. गरजेनुसार अन्य रुग्णालयांनाही ऑक्सिजन पुरविला जाईल, असे डॉ. कदम म्हणाले.

Web Title: Strategic decision on corona vaccine at cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.