बावची फाट्यावर रस्त्यावरील बाजार ठरतोय अपघाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:40+5:302021-06-05T04:20:40+5:30
गोटखिंडी : इस्लामपूर-आष्टा रस्त्यावर बावची (ता. वाळवा) फाट्याच्या पूर्व बाजूस रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विक्रेते बसत असल्याने तेथे गर्दी ...
गोटखिंडी : इस्लामपूर-आष्टा रस्त्यावर बावची (ता. वाळवा) फाट्याच्या पूर्व बाजूस रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विक्रेते बसत असल्याने तेथे गर्दी होत असते. खरेदी करणाऱ्यांची वाहने रस्त्यावरच थांबत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बावची फाट्यावरील पेटोल पंपासमोर काही शेतकरी भाजीपाला विकत बसत होते. कालांतराने तेथे गर्दी होत असल्याने आष्टा पोलिसांनी कित्येक वेळा त्यांना समज देऊन हुसकावून लावले. परंतु पोलीस गेले की पुन्हा बाजार भरत असे. सुरुवातीला दोन-तीन शेतकरी तेथे बसत होते. आता जणू बाजार भरल्याचे दिसून येत आहे. जाणारी-येणारी वाहने थांबवून भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होत असते. गावात बाजार बंद असल्याने रस्त्यावरच बाजार भरवला जात आहे. वाहने रस्त्यावरच थांबवली जात असल्याने इतर वाहनधारकांना गैरसोयीचे बनत आहे. त्यातून अपघात होण्याची शक्यता आहे.