पथदिवे बंद; विद्युत अभियंता धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:28 AM2021-05-21T04:28:17+5:302021-05-21T04:28:17+5:30
या तक्रारींची दखल घेत सिंहासने, नगरसेवक गजानन मगदूम, गीतांजली ढोपे-पाटील यांनी गुरुवारी विद्युत विभागाचे कार्यालय गाठले. विद्युत अभियंता अमर ...
या तक्रारींची दखल घेत सिंहासने, नगरसेवक गजानन मगदूम, गीतांजली ढोपे-पाटील यांनी गुरुवारी विद्युत विभागाचे कार्यालय गाठले. विद्युत अभियंता अमर चव्हाण यांना धारेवर धरत साहित्य पुरवठा कधी करणार, असा जाब विचारला. अखेर दोन दिवसात साहित्य पुरवठा होईल, पथदिव्यांची दुरुस्ती करू, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. विद्युत विभागाचा कारभार अनागोंदी पद्धतीने सुरू आहे. विद्युत अभियंत्यांना पथदिवे दुरुस्तीसाठी दोन दिवसांची वेळ दिली आहे. या वेळेत पथदिवे दुरुस्त न झाल्यास नागरिकांसह महापालिकेसमोर आंदोलन करू, असा इशारा सिंहासने यांनी दिला आहे.
चौकट
तीन दिवसात आठ श्वानांची नसबंदी
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून श्वान पकडण्याचा केवळ फार्स केला जात आहे. तीन दिवसांत केवळ १२ श्वान पकडले असून, त्यापैकी आठ श्वानांची नसबंदी करण्यात आली आहे. त्यांना पकडण्याची मोहीम गतीने राबविण्याची आवश्यकता असल्याचेही सिंहासने यांनी सांगितले.