लॉकडाऊनची अफवा पसरवल्यास कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:55+5:302021-02-25T04:32:55+5:30
सांगली : राज्यातील काही भागांत कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी, जिल्ह्यात अद्याप तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...
सांगली : राज्यातील काही भागांत कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी, जिल्ह्यात अद्याप तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन होणार, अशी भीती घालून द्राक्ष, भाजीपाला उत्पादक यांच्या मालाचे दर व्यापारी पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, सध्या द्राक्षांना चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. मात्र, पुन्हा लॉकडाऊनची भीती घालून व्यापारी दर पाडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची भीती घालून शेतकऱ्यांचे नुकसान कोणीही करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी लागेल.