महिला पोलिसावरील हल्लेखोरावर कठोर कारवाई हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:52+5:302021-05-20T04:27:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीत महिला पोलिसावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक केली असली तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीत महिला पोलिसावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक केली असली तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेत्या नीता केळकर यांनी केली.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,
सांगलीमध्ये महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर हल्ला करून विनयभंग करणाऱ्यांचा तीव्र शब्दांत निषेध करते. आजपर्यंत अशा पद्धतीची घटना सांगलीत कधीच घडलेली नाही. विशेषतः महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर हल्ला करण्याच्या मानसिकतेला ठेचून काढण्याशिवाय पर्याय नाही. ज्या पद्धतीने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या हल्ला करणाऱ्यांना शोधून काढून अटक केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पुन्हा अशा पद्धतीचे घटना घडू नये यासाठी सर्व ती कठोर पावले पोलिसांनी उचलावीत. महिला असो किंवा शासकीय महिला कर्मचारी कुणावरही शारीरिक हल्ले करणे, विनयभंग करणे हे शिक्षेस पात्र आहे. अशा पद्धतीने वागणारी व्यक्ती किंवा समूह यांची गय करता कामा नये. सध्याच्या काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचारी त्यांचे कुटुंब आणि नोकरी यामध्ये समन्वय साधून मोठ्या तणावातून काम करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.