नेर्ले गावात आजपासून कडक लॉकडॉऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:55+5:302021-07-19T04:17:55+5:30
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सोमवार, दि. १९पासून गाव पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला ...
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सोमवार, दि. १९पासून गाव पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. विनाकारण फिरणारे व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नेर्लेत आजअखेर ६५ रुग्ण असून, रोज नव्याने रुग्ण सापडत आहेत. दूध संकलन सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ७ ते ९ यावेळेत होणार आहे. फक्त औषध दुकाने व रुग्णालये सुरू राहणार आहेत.
या बैठकीला सरपंच छायाताई रोकडे, कासेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते, संजय पाटील, संभाजी पाटील, अवधूत कुलकर्णी, मारुती दळवी, सुभाष पाटील, उपसरपंच विश्वास पाटील, महेश पाटील, अनिल साळुंखे, तलाठी पंडित चव्हाण, पोलीस पाटील अतुल बंदसोडे, ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण उपस्थित होते.