रेठरे धरण येथे २४ ते २७ पर्यंत कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:54+5:302021-04-24T04:26:54+5:30
रेठरे धरण येथे कोरोनाची रुग्णसंख्या ६५ वर गेली असून यामधील तीस व्यक्ती काेराेनामुक्त झाल्या आहेत. तीन रुग्णांचे ...
रेठरे धरण येथे कोरोनाची रुग्णसंख्या ६५ वर गेली असून यामधील तीस व्यक्ती काेराेनामुक्त झाल्या आहेत. तीन रुग्णांचे निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीत सरपंच लतिका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन कमिटीची बैठक घेण्यात आली. या वेळी गावात विनामास्क फिरणाऱ्या लोकांना २०० रुपये दंड, गावात बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांंना बंदी, कोरोना झालेले अथवा होम क्वारंटाइन लोक जर घराबाहेर आढळल्यास कायदेशीर कारवाईचा ठराव करण्यात आला. बाहेरील नातेवाइकांना कोरोनाच्या काळात गावात येण्यास मनाई करण्यात आली आहे. या वेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, माजी सरपंच सुदाम पाटील, उपसरपंच नीलेश पाटील, पोलीस पाटील उमेश बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, यशवंत वाघमारे, तानाजी पवार, अजित पाटील, महादेव पाटील, जगन्नाथ घेवदे, रवींद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र देवकर, डॉ. जितेंद्र मोरे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.