पेठमध्ये आजपासून कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:24+5:302021-07-18T04:19:24+5:30

पेठ गावात कोरोनाचे ९४ सक्रिय रुग्ण असून दररोज दहा-बारा रुग्ण सापडत आहेत. कोरोना रुग्णांच्या घरातील व्यक्ती राजरोसपणे बाहेर फिरताना ...

Strictly closed in Peth from today | पेठमध्ये आजपासून कडकडीत बंद

पेठमध्ये आजपासून कडकडीत बंद

Next

पेठ गावात कोरोनाचे ९४ सक्रिय रुग्ण असून दररोज दहा-बारा रुग्ण सापडत आहेत. कोरोना रुग्णांच्या घरातील व्यक्ती राजरोसपणे बाहेर फिरताना आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सग्राट............... महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, माजी उपसरपंच शकर पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक नामदेव कदम, धनपाल माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. कोरोना रोखण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवहार पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. चंद्रकांत पवार, उपसरपंच अमीर ढगे, ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण, तलाठी के. बी. मुलाणी, संपत पाटील, गोरख मदने, बरकत जमादार, डी. के. कदम, विकास पेठकर उपस्थित होते.

चौकट

फक्त औषध दुकाने व रुग्णालये सुरू

दूध संकलन आणि विक्रीसाठी सकाळी व सायंकाळी सात ते नऊची वेळ देण्यात आली असून फक्त औषध दुकाने व रुग्णालये सुरू राहणार आहेत. इतर सर्व दुकाने बंद राहणार.

Web Title: Strictly closed in Peth from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.