विलगीकरणाची अंमलबजावणी कठोरपणे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:49+5:302021-06-18T04:19:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्ण आणि त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्ती यांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्ण आणि त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्ती यांचे विलगीकरण कठोरपणे करायला हवे. कंटेनमेंट झोनमधील कुटुंबांना घरपोच सेवा दिल्यास हा संसर्ग रोखण्यात यश येईल, असे मत जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती आशाताई पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील यांनी वाळवा तालुक्यातील साटपेवाडी, बोरगाव, वाळवा, शिरगाव, कामेरी या गावांना भेटी दिल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांकडून कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
त्या म्हणाल्या, कोरोना उपचारासाठी होणारा खर्च सामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा आहे. हा खर्च टाळून बाधित आणि त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींना यातून बरे करण्यासाठी विलगीकरण हाच एकमेव उपाय आहे.
यावेळी पं.स. सदस्य रूपाली सपाटे, नामदेव पवार, प्रवीण जाधव, तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील उपस्थित होते.