सांगलीत विनाकारण फिरणाऱ्यांना आता जबर दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:52 AM2020-04-17T10:52:40+5:302020-04-17T10:53:07+5:30

त्यात कारवाईबरोबरच वाहनचालक, मास्क न वापरणाºयांवर व मॉर्निंग वॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी मास्क न वापरणा-या २६४ जणांवर कारवाई करण्यात आली होती, तर गुरूवारीही ११९ नागरिकांना मास्क न वापरल्याने कारवाईला सामोरे जावे लागले.

Striking for no reason now | सांगलीत विनाकारण फिरणाऱ्यांना आता जबर दणका

सांगलीत विनाकारण फिरणाऱ्यांना आता जबर दणका

Next
ठळक मुद्देया नागरिकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन चालू असतानाही, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसात ३६५ हून अधिक वाहनचालकांना, तर मास्क न वापरणा-या ११९ नागरिकांनाही कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यानुसार विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर कारवाई केली जात आहे. संचारबंदीमुळे व संसर्ग टाळण्यासाठी बाहेर न फिरणे महत्त्वाचे असतानाही, अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी अधिक कडक कारवाई सुरू केली आहे.

त्यात कारवाईबरोबरच वाहनचालक, मास्क न वापरणाºयांवर व मॉर्निंग वॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी मास्क न वापरणा-या २६४ जणांवर कारवाई करण्यात आली होती, तर गुरूवारीही ११९ नागरिकांना मास्क न वापरल्याने कारवाईला सामोरे जावे लागले. या नागरिकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही नियम न पाळणाºयांवर कारवाईसाठी जिल्हा सीमेवर इलेक्ट्रीक यंत्रणा कार्यन्वित करण्यात येणार आहे.गुरूवारीही बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच होती. पोलिसांना मदतीसाठी विशेष पोलीस अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचाही वाहतूक नियोजनासाठी फायदा होत आहे.
दरम्यान, वाहनांवर विनाकारण ह्यअत्यावश्यक सेवाह्ण लिहून फिरणारे व वाहनावर प्रेस लिहून फिरणा-यांवरही कारवाई करण्यात आली.

Web Title: Striking for no reason now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.