मराठा क्रांती मोर्चाची जिल्ह्यात जोरदार तयारी

By admin | Published: September 22, 2016 12:58 AM2016-09-22T00:58:42+5:302016-09-22T00:58:42+5:30

सर्व स्तरातून पाठिंबा

Strong preparation in the District of Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चाची जिल्ह्यात जोरदार तयारी

मराठा क्रांती मोर्चाची जिल्ह्यात जोरदार तयारी

Next

सांगली : सांगली येथे २७ सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मोर्चाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. नियोजनासंदर्भात सांगली जिल्ह्यातील गावा-गावात बैठका सुरू झाल्या असून पक्ष, संघटना बाजूला सारून मेळाव्यासाठी जाण्याची तयारी सुरू झाली आहे.
शैक्षणिक विक्रेता संघटनेकडून प्रवास खर्च
इस्लामपूर : मराठा क्रांती मोर्चास वाळवा तालुका शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबतचे पत्र मराठा क्रांती मोर्चाचे वाळवा तालुका संयोजक उमेश कुरळपकर यांच्याकडे देण्यात आले. दरम्यान, राज्य संघटक मोहन पाटील हे इस्लामपूर येथील सर्व व्यापाऱ्यांचा इस्लामपूर ते सांगली जाण्या-येण्याचा प्रवास खर्च करणार आहेत.
यावेळी राज्य संघटक मोहन पाटील, शहर उपाध्यक्ष अभय शहा, सचिव अभिजित पाटील, खजिनदार मनोज जैन, उदय चव्हाण, हितेंद्र कटारिया, रितेश शहा, जगोध्दार पाटील, सचिन माने, गौरव शहा, रघुनाथ पायमल उपस्थित होते.
वाळव्यातून १५ हजार लोक सहभागी होणार
वाळवा : मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी मंगळवारी रात्री झालेल्या हुतात्मा चौकातील बैठकीत सरपंच गौरव नायकवडी यांनी वाळव्यातून १५ हजारहून अधिक लोकांचा सहभाग राहणार असल्याचे सांगितले.
वाळवा गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. बैठकीला गावातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध संघटना व सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी उपसरपंच नेताजी पाटील, प्रशांत थोरात, नजीर वलांडकर, जिल्हा युवक कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष नंदकुमार शेळके, वाळवा तालुका युवक कॉँग्रेसचे राजू वलांडकर, डॉ. राजेंद्र मुळीक, बाळासाहेब थोरात, चंद्रशेखर शेळके, उमेश घोरपडे, बाजीराव नायकवडी, संजय अहिर, विक्रम झेंडे, माजी उपसरपंच नंदू पाटील, सावकर कदम उपस्थित होते.
खरशिंगमध्ये बैठक
देशिंग : कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागातील दहा ते पंधरा हजार बांधव सहभागी होण्याचा निर्धार खरशिंग येथील बैठकीत करण्यात आला. देशिंग, खरशिंग, बनेवाडी, मोरगाव गावांमध्ये जिजाऊ ब्रिगेड सांगलीवाडी यांच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेमलता देसाई, सुप्रिया घारगे, सुजाता भगत, लता पाटील, सुवर्णा माने, पूजा पाटील, तेजस्वी पाटील, स्वाती पाटील, माधुरी पाटील महिला उपस्थित होत्या. संयोजन विक्रम शिंदे, रणजित पाटील यांनी केले.
पाच वाहने देणार
किर्लोस्करवाडी : रामानंदनगरमधील मुस्लिम समाजाचे अख्तर पिरजादे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन के ले. त्यांचे यावेळी आभार मानले. महाराष्ट्र राज्य बेरड रामोशी कृती समिती, एम. एन. गु्रप यांच्यामार्फत विशाल मदने यांनी या मोर्चासाठी पाठिंबा जाहीर केला. सुनी मुस्लिम जमात (रामानंदनगर) यांच्यावतीने येण्या-जाण्यासाठी ५ वाहने देण्याचे जाहीर केले. (वार्ताहर)
 

Web Title: Strong preparation in the District of Maratha Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.