सांगलीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 04:50 PM2020-06-23T16:50:48+5:302020-06-23T16:59:19+5:30
मागील २८ दिवसांमध्ये दररोज बीजेपी सरकार पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करीत आहे. त्यामुळे देशात महागाई वाढत आहे. दरवाढ सरकारने त्वरित मागे घावी यासाठी सांगलीत त्रिमूर्ती रिक्षा स्टॉप जवळ दुपारी १२ वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
सांगली- मागील २८ दिवसांमध्ये दररोज बीजेपी सरकार पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करीत आहे. त्यामुळे देशात महागाई वाढत आहे. दरवाढ सरकारने त्वरित मागे घावी यासाठी सांगलीत त्रिमूर्ती रिक्षा स्टॉप जवळ दुपारी १२ वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी शंकर पुजारी यांनी सांगितले की, या देशातील कामगार कायदे स्थगित करीत असताना भाजप सरकार असे समर्थन करीत आहे की, टाळेबंदीमध्ये बंद पडलेले कारखाने परत सुरु करण्यासाठी आम्ही कामगार कायदे स्थगित करीत आहोत ,परंतु हे खरे नसून कोरोना महामारी येण्यापूर्वीच मंदीमुळे या देशातील अनेक उद्योगधंदे बंद पडलेले होते, पूर्वीच प्रचंड बेकारी देशांमध्ये पसरली होती, यामुळे आता कारखाने पूर्ववत सुरू होण्यासाठी कामगारांना विश्वासात घेऊन स्वतंत्र नियोजनाची आवश्यकता आहे.
नंदकुमार हतीकर यांनी सांगितले, की संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीने आलेल्या मंदीने क्रूड ऑइल तेलाचे दर उतरले आहेत. तेल कंपनीचे मालक फुकट तेल घेऊन जावा असे सांगत आहेत. त्यामुळे सर्व कराची आकारणी करून ४० रुपये दराने एक लिटर पेट्रोल देणे परवडणारे आहे. परंतु आज पेट्रोलचा दर ८५ ते ९० रुपये पर्यंत झालेला आहे म्हणूनच या दर वाढीला आणि वाढत्या महागाईला बीजेपीचे सरकार जबाबदार आहे. दर मागे न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन करून असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व सुमन शंकर पुजारी, नंदकुमार हत्तीकर, विजय बचाटे, सुरेश पाटील, वर्षा गडचे, तानाजी पाटील, नरेंद्र कांबळे, राठोड रावसो पाटील इत्यादींनी केले