होलार समाजाच्या विकासासाठी संघर्ष गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:30 AM2021-09-14T04:30:48+5:302021-09-14T04:30:48+5:30
फोटो ओळ : सांगलीत होलार समाजाच्या बैठकीत चंद्रशेखर केंगारचंद्र यांचा राजाराम ऐवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोकमत न्यूज ...
फोटो ओळ : सांगलीत होलार समाजाच्या बैठकीत चंद्रशेखर केंगारचंद्र यांचा राजाराम ऐवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : होलार समाजातील युवकांनी विकासासाठी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे. आजपर्यत संघर्ष केला नाही म्हणून समाजाचा विकास झाला नाही, असे मत होलार समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांनी व्यक्त केले.
सांगलीत होलार समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी चंद्रशेखर केंगार यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते सिद्राम जावीर होते.
चंद्रशेखर केंगार यांचा राजाराम ऐवळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अमित केंगार, राजू गेजगे, आनंद ऐवळे, दीपक हेगडे, आनंदा हात्तेकर, दगडू ऐवळे, सिध्देश्वर करडे, आक्षय हात्तेकर, सुमित जावीर, आजय हातेकर, ओकार देवमाने, शुभम ऐवळे, अमित केंगार, ज्ञानेश्वर ऐवळे, दत्ता गेजगे आदी उपस्थित होते.
130921\img-20210912-wa0064.jpg
होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पद्दी होलार समाजाचे युवा नेते.चंद्रशेखर केंगार यांची निवड करण्यात आली. यावेळी राजाराम ऐवळे,राजु गेजगे:'.सिद्राराम जावीर,आनंद ऐवळे,दत्ता गेजगे आदी उपस्थित होते.